Ayushman Bharat Yojana List Kashi Pahavi : नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आयुष्यमान भारत योजना लाभार्थी यादी मोबाईल वरून तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता व डाऊनलोड करायची याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य विमा मिळतो.
Ayushman Bharat Yojana List पीएम आयुष्यमान भारत योजना लाभार्थी यादी ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना अर्थात बीपीएलधारकांना आरोग्य विमा योजना प्रदान करते. या योजनेत उद्दिष्ट म्हणजेच प्रधानमंत्री
आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थी व्यक्तीला हॉस्पिटल वार्षिक 5 लाखापर्यंत कॅशलेस विमा म्हणजेच आरोग्य विमा दिला जातो. तर या योजनेसाठी कुठेही पैसे तुम्हाला भरावे लागत नाहीत. जो व्यक्ती प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पात्र आहे अश्या व्यक्तींना शासकीय खाजगी रुग्णालयात 5 लाखापर्यंत मोफत उपचार केला जाऊ शकतो.
सामाजिक आर्थिक जनगणना 2011 च्या आधारे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांची यात निवड केली जाणार आहे. याचीच यादी कशी पाहायची आहे ?ही माहिती पाहूया.
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनाची यादी कशी पाहायची ?
Ayushman Bharat Yojana List
- सर्वप्रथम आयुष्मान भारत योजनेची यादी कशी काढायची
- यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल.
- आयुष्यमान भारत अधिकृत वेबसाईट :- https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/
- त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल,
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर 8 अंकी ओटीपी तुमच्या मोबाईल वर
- आलेला असेल तो त्या रखाण्यात टाकल्यानंतर चौकानात कॅपच्या कोड टाकावे लागतो.
- त्यानंतर लॉगिन पर्याय या बटन वर क्लिक करून लॉगिन करावे लागते
- त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचा आहे
- त्यानंतर तुमचा जो जिल्हा, तालुका, गाव अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव आले किंवा नाही ? हे तपासू शकता.
Ayushman Bharat Yojana List
आयुष्यमान कार्ड योजना हॉस्पिटल यादी महाराष्ट्र पीडीएफ कशी पहावी ?
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हॉस्पिटलची यादी म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेत कोणकोणते हॉस्पिटल हे राज्यामधील येतात हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेल्या
अधिकृत वेबसाईट लिंकवर जाऊन तेथे पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही आज जाणून घेतले आयुष्यमान भारत योजनेची गावानुसार यादी कशी पाहायची ? किंवा आयुष्यमान भारत योजनेत तुमचं नाव आलेकिंवा नाही ? हे कसं पहायचे याची माहिती आणि सोबतच महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती हॉस्पिटल आहे याची यादी कशी पहायची हे सुद्धा जाणून घेतलं.
हे वाचा : PM Svanidhi Yojana in Marathi | व्यवसायासाठी ₹ 5०००० कर्ज, असा करा अर्ज