Personal Loan : ‘हे’ पाच ॲप्स : 10 हजारापासून 5 लाखांपर्यंत देतात अर्जंट कर्ज

Personal Loan

Personal Loan : ‘हे’ पाच ॲप्स : 10 हजारापासून 5 लाखांपर्यंत देतात अर्जंट कर्ज

आजकाल सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणे, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, किंवा गाडी खरेदी करण्यासाठी कर्जाची (Personal Loan) गरज पडते. मात्र, बँकेकडून कर्ज मिळवणे हे अनेकदा अडचणीचे ठरते. त्यामुळे, आज आपण काही अशा मोबाइल अॅप्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने आपण झटपट कर्ज प्राप्त करू शकतो. या अॅप्समध्ये कोणत्या सुविधा आहेत आणि त्यांची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेऊ.

आपण काही वैयक्तिक कर्ज देणार्‍या अॅप्सबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यांच्या मदतीने आपण अल्पावधीत कर्ज प्राप्त करू शकतो आणि हे कर्ज थेट आपल्या बँक खात्यात जमा होते. या अॅप्सद्वारे अर्ज केल्यानंतर लगेचच वैयक्तिक कर्ज मिळते आणि उत्पन्नाचे कोणतेही प्रमाणपत्र जोडण्याची गरज नसते. यावरील व्याजदरही अत्यंत कमी असतो.

या अॅप्सच्या काही अटी आणि पात्रता आहेत. जर तुम्ही या पात्रता पूर्ण करत असाल, तर तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू शकते. ही अॅप्स तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत. पहिली अॅप म्हणजे Hero FinCorp Personal Loan App, ज्याद्वारे तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळते. याद्वारे तुम्हाला ५०,००० रुपयांपासून ते ३,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी सहा महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत असू शकतो. यावरील व्याजदर २५% प्रति वर्ष आहे. Hero FinCorp अॅपद्वारे फक्त वैयक्तिक कर्जच (Personal Loan) नाही तर शैक्षणिक कर्ज, लग्न कर्ज, वैद्यकीय कर्ज, घर बांधणी कर्ज, वाहन तारण कर्ज इत्यादी विविध प्रकारचे कर्जही मिळू शकतात. या अॅपची सेवा २४/७ उपलब्ध आहे, म्हणून तुम्ही कोणत्याही वेळी कर्ज मिळवू शकता.

या अॅप्सच्या काही पात्रता आहेत, जसे की तुमचे मासिक उत्पन्न कमीतकमी १५,००० रुपये असावे, तुमचे वय कमीतकमी २१ वर्षे पूर्ण असावे, आणि तुम्ही भारतातील रहिवासी असावे. या अॅप्सद्वारे तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून कर्ज प्राप्त करू शकता.

दुसरी अॅप म्हणजे DMI finance, ज्याद्वारे तुम्ही १०,००० रुपयांपासून ते ५,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता. यावरील व्याजदर १५% आहे. कर्ज परतफेडाचा कालावधी सहा महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंत असू शकतो. याद्वारे तुम्ही विविध प्रकारचे कर्ज प्राप्त करू शकता.

तिसरी अॅप म्हणजे IIFL loan app, ज्याद्वारे तुम्हाला ५,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यावरील व्याजदर २१% ते ३०% दरम्यान आहे. याचा परतफेडाचा कालावधी आपण आपल्या सोयीनुसार निवडू शकता. जर आपल्याला एक वर्षाचा कालावधी (Personal Loan) असेल तर, आपण एक वर्षापर्यंतचा कालावधी निवडू शकता. या अॅपद्वारे दिला जाणारा कालावधी हा चार वर्षापर्यंतचा आहे. परंतु जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर आपण तो करू शकता.

सोप्या अर्ज पद्धतीनुसार, आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून या अॅप्सद्वारे कर्ज मंजूर होऊ शकते. त्यानंतरचे अॅप म्हणजे Creditt Plus, जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर, या अॅपद्वारे कर्ज मिळू शकते. या अॅपद्वारे तुम्हाला १०,००० रुपयांपासून ते ३५,००० रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. यावरील व्याजदर २०% आहे. या अॅपद्वारे कर्ज मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहेत. जर तुम्हाला इतर कोणत्याही अॅपद्वारे कर्ज मिळत नसेल तर, तुम्ही Creditt Plus अॅपद्वारे सहजपणे कर्ज मंजूर करू शकता.

शेवटचे अॅप म्हणजे FlexSalary. या अॅपद्वारे कर्ज मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. यावर मिळणारे वैयक्तिक कर्ज हे २,००,००० रुपयांपर्यंतचे मिळते. यावरील व्याजदर १९% ते ५५% दरम्यान आहे. या अॅपद्वारे मिळणाऱ्या कर्जाचा परतफेडाचा कालावधी १० महिन्यांपासून ते ३६ महिन्यांपर्यंत आहे. या अॅपच्या (Personal Loan) काही अटी आहेत, जसे की तुम्ही भारताचे नागरिक असायला हवेत, तुमचे वय २१ वर्षे पूर्ण असायला हवे, आणि तुमचे मासिक उत्पन्न कमीतकमी ८,००० रुपये असायला हवे. या अॅपच्या सुविधा २४ तास उपलब्ध आहेत.

अशा प्रकारे, ही काही ऑनलाइन अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने आपण घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून कर्ज मंजूर करून घेऊ शकता. या अॅप्सचा वापर करून आपण आपल्या आर्थिक गरजा सहजपणे पूर्ण करू शकता.

सूचना: १) ही माहिती विविध स्रोतांमधून घेण्यात आली आहे. लोन अॅप्सच्या नियमांमध्ये कधीही बदल होऊ शकतात. अशा अॅप्सचा उपयोग करताना, व्याजदर आणि परतफेडीच्या नियमांचा विचार करा आणि संपूर्ण माहिती घेऊनच कर्जा घेण्याचा निर्णय घ्यावा.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram

Recent Post