scholarship :‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये काय आहे ‘ही’ योजना जाणून घ्या

scholarship :‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये काय आहे ‘ही’ योजना जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य तसेच भारत सरकार तर्फे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. या योजने अंतर्गत अनेक गरजू लोकांना मदत देखील पुरवली जाते. त्याचप्रमाणे काही योजना या विद्यार्थ्यां साठी ( scholarship for college students) देखील चालू करण्यात आल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांनात्यांच्या शिक्षणामध्ये आर्थिक मदत केली जाईल. आज आपण अशाच एका योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

ही योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी obc scholarship scheme आहे. या ओबीसी कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 60000 रुपये इतकी मदत स्कॉलरशिप स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे? अर्ज कोठे करावा? या अर्जाची पात्रता कोणती व या अर्जाचा कालावधी किती? सर्वांची माहिती त्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Yojna) आधार योजना याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 60000 रुपये स्कॉलरशिप स्वरूपातील जाणार आहेत.इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” साठी निकष व अटी लागू करणेबाबत चा GR हा आलेला आहे हा जीआर 11 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यात आली आहे. या योजनेला दि.१३.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये दिले जाणार आहेत ते तीन टप्प्यात दिले जाणार आहे. 

ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 32 हजार रुपये, निवास भत्ता 20000 रुपये, निर्वाह भत्ता 8000 रुपये अशा प्रकारे एकूण 60 हजार रुपये (scholarship) तीन पट्ट्यांमध्ये दिले जाणार आहे. तर इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8000 असे एकूण 51 हजार रुपये दिले जाणार आहेत.

हे वाच : mahila samriddhi karj Yojana | महिलांसाठी ५ लाख रुपये त्वरित कर्ज! महिला समृद्धी कर्ज योजनेचा लाभ घ्या!

इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 25 हजार रुपये, निवास भत्ता 12 हजार रुपये, निर्वाह भत्ता 6000 रुपये असे एकूण 43 हजार रुपये दिले जाणार आहेत. तालुक्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता (scholarship) 23 हजार रुपये, निवास होता 10 हजार रुपये, निर्वाह भत्ता 5000 रुपये असे एकूण 38 हजार रुपये दिले जाणार आहेत. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आहे त्या म्हणजे विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हाशल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे.

तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बैंक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील तो विद्यार्थी रहिवासी असावा.

तो विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेणार असावा. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण (scholarship for college students) असावेत. या योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्यांच्या 70 टक्के जागा या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर 30 टक्के जागा या बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची उपस्थिती ही 75 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ तुम्हाला जास्तीत जास्त पाच वर्ष तर जे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सहा वर्ष इतका आहे. या योजनेचा (scholarship for college students) लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय हे तीस वर्षाच्या आतील असावे. ही योजना धनगर समाज विद्यार्थ्यांसाठी नसणार आहे. तसेच या योजना अंतर्गत शिक्षण घेणारा विद्यार्थी जर अनुत्तीर्ण झाला तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो विद्यार्थी या योजनेचा अर्ज करणार आहे तो इतर कोणत्याही प्रकारची नोकरी करणारा नसावा. महिलांसाठी तीस टक्के आरक्षण हे या योजनेसाठी आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची मर्यादा ही 50 टक्के आहे. 

भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र ,स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत),कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

या योजनेचा अर्ज तुम्हाला इतर मागास बहुजन (Savitribai Phule Aadhaar Yojana) कल्याण विभागामध्ये या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरता येईल. ऑनलाइन पद्धतीने देखील या योजनेचा अर्ज भरता येतो परंतु अजून ऑनलाईन लिंक ओपन झालेली नाही.

या योजनेनुसार दिले जाणारे रक्कम हे त्रैमासिक स्वरूपाचे आहे. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर सात दिवसांमध्ये पहिली रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल

अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील ऑनलाइन ऑफलाइन फॉर्म नक्की भरा. त्याचा फायदा तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच होईल.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram

Recent Post