Gay Gotha Anudan Yojana 2024: गाय गोठा अनुदान योजना; जाणून घ्या कसे करायचे अर्ज!
शेतकर्यांना शेती तसेच पशुपालनासाठी (Gay Gotha Anudan Yojana) आर्थिक मदत व्हावी म्हणून गाय गोठा बांधण्यासाठी सरकारकडून (Government Scheme) गाय गोठा अनुदान योजना राबवण्यात येत आहे.या योजनेंतर्गत 1,60,000 रुपये अनुदान स्वरुपात दिले जाते.
योजनेचे स्वरूप
पशुपालकांकडे असलेल्या जनावरांची संख्या तीन असल्यास, पशुशेड (Cattle Shed Subsidy Scheme) बांधण्यासाठी शासन 75,000 ते 80,000 रुपये अनुदान देते.जर एखाद्या शेतकर्याकडे जनावरांची संख्या तीनपेक्षा जास्त असेल, तर या योजनेंतर्गत शेड बांधण्यासाठी सरकार 1,16,000 रूपयांची आर्थिक मदत करेल.तुमच्याकडे गायी आणि म्हशींची (Cow & Buffalo) संख्या जास्त असल्यास सरकारकडून 1,60,000 रुपये अनुदान दिले जाईल.त्यामुळे त्यांना जनावरांचे गोठा सहज बांधता येणार आहे.
पात्रता:
महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. लघु आणि अल्पभूधारक शेतकरी, विधवा महिला, माजी सैनिक आणि ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य दिले जाते. एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 4 गोवंशांसाठी अनुदान मिळू शकते.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- जमीन मालकीचा पुरावा
- पशुधन नोंदणी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
अर्ज प्रक्रिया:
- गाय गोठा योजनेसाठी (Gay Gotha Anudan Yojana) अर्ज जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयात किंवा महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन महामंडळाच्या कार्यालयात ऑफलाइन किंवा ऑनलाइन करता येतात.
- ऑफलाइन अर्जासाठी, अर्जदाराने वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधावा आणि निर्धारित अर्ज फॉर्म भरावा.
- ऑनलाइन अर्जासाठी, अर्जदार या वेबसाइटला भेट देऊ शकतो आणि “गाय गोठा योजना” अंतर्गत ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, पशुसंवर्धन विभागाकडून अर्जाची तपासणी केली जाईल आणि पात्र अर्जदारांना निवडून अनुदान दिले जाईल.
हे वाचा Two Wheeler Insurance 2024 | दुचाकी विमा पॉलिसी घेण्याचे फायदे आणि तोटे
अतिरिक्त माहिती:
गाय गोठा योजनेअंतर्गत, गोठा (Gay Gotha Anudan Yojana) बांधणीसाठी 50% ते 75% पर्यंत अनुदान दिले जाते.अनुदानाची रक्कम गोठ्याच्या आकारावर आणि अर्जदाराच्या जातीवर अवलंबून असते.अधिक माहितीसाठी, अर्जदार जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयाशी किंवा महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
गाय गोठा योजनेत पीडीएफ मध्ये खालील माहिती भरा
- अर्जदाराने स्वत:ची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
- लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व 7/12 व 8 अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे. लाभार्थ्याला गावचा रहिवासी पुरावा जोडायचा आहे.
- तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
- त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
- त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकार्यांच्या सही शिक्यानुसार पोचपावती दिली जाईल.