7/12 Download : शेतकऱ्यांना 7/12 उतारा ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला सुद्धा काढायचा असेल तर या लेखामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. तुम्हाला सुद्धा माहित असेल महाराष्ट्र शासनाद्वारे 7/12 उतारा, 8-अ, भू नकाशा फेरफार अशा अनेक प्रकारच्या सुविधांसाठी ऑनलाइन पोर्टल वर ही सुविधा सुरू केलेली आहे.
तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामधील ऑनलाइन पद्धतीने सातबारा बघणे अगदी सोपे झालेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती आता घरामध्ये बसून सुद्धा आपल्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो. कारण आता सातबारा उतारा जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने सुद्धा काढू शकता
शेतकरी मित्रांनो शासनाद्वारे महाराष्ट्र सरकारने भुमी लेख नावाचे पोर्टल सुरू केलेले आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही सातबारा (7/12 Download) ऑनलाइन पद्धतीने बघू शकतात. आणि तुम्हाला तो सातबारा उतारा डाऊनलोड करायचा असेल तर तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतात.
आज या लेखामध्ये आपण पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत सातबारा कशा पद्धतीने शोधायचा त्याचप्रमाणे सातबारा कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा व सातबारा डिस्ट्रिक्ट नुसार कशा पद्धतीने शोधायचा अगदी एकदम सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत. आणि आम्ही सांगितलेले माहिती बघून आणि तुम्ही व्यवस्थित माहिती समजून घेतल्यानंतर तुम्हाला कधी सातबारा उतारा काढण्याकरता सेवा केंद्र वर जायला चालणार नाही. चला तर आपण सविस्तर माहिती समजून घेऊया.
7/12 उतारा म्हणजे नेमके काय? 7/12 Utara Download
7/12 उतारा म्हणजे आपल्या स्वतःच्या जमिनीचा एक प्रकारचा आरसा (7/12 Download) होय. कारण उतारा वाचल्यानंतर प्रत्यक्षरीत्या जमिनीवर न जाता त्या जमिनीची संपूर्ण माहिती आपल्याला बसल्या जागी समजू शकते. यामुळे महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1981 च्या माध्यमातून शेत जमिनीच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जात असतात.
याकरता वेगवेगळी नोंदणी पुस्तके वापरली जातात. त्याला आपण रजिस्टर बुक सुद्धा म्हणत असतो. आपल्याला या रजिस्टरमध्ये कुडांचे मालकी हक्क शेत जमिनीचे हक्क त्यातल्या पिकांचे हक्क याचा सुद्धा समावेश केलेला असतो.
त्याचप्रमाणे यासोबत 21 वेगवेगळ्या प्रकारच्या गावाचे नमुने सुद्धा ठेवलेले असतात. यापैकी गावाचा नमुना नंबर सात तसेच गावाचा नमुना नंबर 12 असा मिळून सातबारा उतारा (7/12 Download) तयार होत असतो. म्हणून त्या उताऱ्याला आपण सातबारा उतारा असे म्हणत असतो. गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर 12 यामधील उतारा असतो. त्यामध्ये बरोबरीने सातबारा उताऱ्यात गावाचा नमुना नंबर 6अ मधील माहिती सुद्धा समाविष्ट केलेली असते.7/12 Utara Download
7/12 उतारा ऑनलाईन ७/१२ Utara Online in marathi
चला तर आपण बघूया 7/12 उतारा ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे शोधायचा. 7/12 Utara Download आपल्याला सर्वात अगोदर महाराष्ट्र सरकारच्या महाभुलेख या वेबसाईट वरती तुम्ही सातबारा बघू शकणार आहात. यामध्ये खालील दिलेल्या प्रमाणे माहिती तुम्हाला भरत घ्यायची आहे.7/12 Utara Download
- सर्वात अगोदर तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला सर्वात अगोदर भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला बॉक्समध्ये तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे.
- आता तुमच्यासमोर तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
- 7/12 उतारा
- 8-अ
- यापैकी तुम्हाला जे हवे असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे.
- यानंतर तुम्हाला येथे जिल्हा तालुका आणि गाव निवडा
- आता तुम्हाला सर्वे नंबर गट नंबर टाका किंवा तुम्ही नावानुसार सुद्धा सर्च करू शकता.
- आता शोधा या बटणावर क्लिक करून तुमच्यासमोर तुमचा सातबारा दिसेल.
वरील दिलेल्या स्टेप वापरून तुम्ही तुमचा सातबारा एकदम सोप्या पद्धतीने घरी बसून तुमच्या मोबाईल वरती सुद्धा डाऊनलोड करू शकता. आता तुम्ही याचा स्क्रीन शॉट सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये घेऊ शकता. किंवा त्याचबरोबर तुम्हाला खाली डाउनलोड पीडीएफ या बटणावर क्लिक करून पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करता येणार आहे.
सातबारा कशा पद्धतीने शोधायचा याविषयीचे प्रश्न उत्तरे FAQ
7/12 उतारा ऑनलाईन कशाप्रकारे वाचावा?
उत्तर : वरील दिलेल्या स्टेप वापरून तुम्ही तुमचा सातबारा डाऊनलोड करून वाचू शकता.
7/12 उतारा म्हणजे काय?
उत्तर : सातबारा उतारा म्हणजे जमिनीच्या (7/12 Download) एक प्रकारचा आरसा होय. कारण आपल्याला हा उतारा वाचून प्रत्यक्ष रिचार्ज जमिनीवर न जाता त्या जमिनीची संपूर्ण माहिती आपल्याला घरबसल्या बघता येऊ शकते. महाराष्ट्र शासनाद्वारे जमीन महसूल कायदा 1981 च्या अंतर्गत शेत जमिनीच्या हक्काबाबत विविध नोंदी ठेवल्या जात असतात त्यालाच आपण सातबारा उतारा असे म्हणतो.
निष्कर्ष : आम्ही आशा करतो की तुम्हाला ऑनलाईन सातबारा कसा शोधायचा तुमच्या मोबाईल मध्ये कशाप्रकारे डाऊनलोड करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असेल. जर तुम्हाला सातबारा उतारा डाऊनलोड करण्याबद्दल कुठलीही समस्या येत असेल तर तुम्ही आम्हाला तुमची प्रक्रिया कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता.